वृंदावन मिसळ, महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आवडणाऱ्यांसाठी हे ठिकाण खरोखरच उत्तम आहे!
इथली मिसळ हलकी झणझणीत असून चवदार आणि अस्सल आहे. रसा वडा, कढी वडा तसेच थिक कोल्ड कॉफी, इडली यांसारखे इतर पदार्थही इथे उपलब्ध आहेत.खमंग, स्वादिष्ट तर्रीसोबत कुरकुरीत फरसाण किंवा वडा यांचा संगम छान लागतो, तसेच कढी वडा हा देखील एक उत्तम पर्याय आहे.किंमत परवडणारी असून स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलेले दिसते, त्यामुळे समाधानकारक जेवणासाठी हे ठिकाण नक्कीच योग्य आहे.